AI technology for early cancer detection saam tv
लाईफस्टाईल

10 वर्षांत कॅन्सरचा आजार संपणार? AI मुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडणार

Cancer Could Become History in a Decade: पुढच्या 10 वर्षात कॅन्सरचा आजार संपणार असल्याचा मोठा दावा AI कंपनीच्या CEOनं केलाय... मात्र खरचं कॅन्सरचा आजार संपणार आहे का? कॅन्सर घालवण्यासाठी AI कसं फायदेशीर ठरणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

AI ने जगभरात खळबळ उडवून दिली असून, आता या तंत्रज्ञानामुळे येत्या काही दशकात वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील AIच्या वापरामुळे कॅन्सरसारखा आजार कसा संपू शकतो? , यासंदर्भात अमेरिकेतील आघाडीची AI कंपनी 'अँथ्रोपिक'चे CEO डारियो अमोडेई काय म्हणाले ऐका

10 वर्षांत कॅन्सरचा आजार संपणार?

कॅन्सर, अल्झायमर, हृदयविकार आणि मानसिक आजार यांसारखे गंभीर आजार पुढील 10 वर्षांत इतिहासजमा होऊ शकतात. AI तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे अनेक दशकांपासून मानवी आरोग्य क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांवर मात करणं शक्य होईल. आरोग्य क्षेत्रात रोगांचं लवकर निदान, औषध संशोधन आणि उपचारांच्या विकासासाठी AI महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. मात्र, पुढील दशकात हे गंभीर आजार पूर्णपणे संपतील, हा सध्या एक अंदाज असून वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेला निष्कर्ष नाही.

दरम्यान डारियो अमोडेई यांच्या दाव्याप्रमाणे भविष्यात AI कॅन्सर आणि अल्झायमरवर मात करण्यासाठी कशी मदत करू शकतो...पाहूयात..

नवीन औषध शोधण्यासाठी हजारो रासायनिक संयुगांची तपासणी करावी लागते, जी अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे.

AI मोठ्या प्रमाणातील माहितीचे वेगाने विश्लेषण करून योग्य संयुगे शोधण्यात मदत करू शकते.

अल्झायमर आणि हृदयरोगाशी संबंधित अनुवांशिक आणि वैद्यकीय माहितीचा सखोल अभ्यास करून AI नवीन धागेदोरे शोधू शकते.. ज्यामुळे प्रतिबंध आणि उपचारांचे मार्ग सुकर होऊ शकतात.

दुसरीकडे डारियो यांच्या दाव्याबद्दल डॉक्टर आणि औषध कंपन्या साशंक आहेत. कारण संगणकावर एखादे औषध प्रभावी दिसले तरी ते थेट रुग्णांना देता येत नाही. प्रयोगशाळा, प्राण्यांवर चाचणी आणि मानवांवर विविध टप्प्यांवर होणाऱ्या क्लिनिकल चाचण्यांमधून औषधाची सुरक्षितता सिद्ध करावी लागते. ही प्रदीर्घ प्रक्रिया असते. त्यामुळे AIचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी फायदेशीर असला तरी प्रयोगशाळेतील पडताळणी मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही... त्यात डारियो यांचा दावा सध्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेला नसला, तरी AI मुळे येत्या काळात नवीन औषधांच्या शोधाला आणि रोगनिदानास मोठी गती नक्कीच मिळू शकते. मात्र, रोगांचे संपूर्ण निर्मूलन हे प्रयोगशाळा आणि क्लिनिकल चाचण्यांच्या प्रत्यक्ष निकालांवरच अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG-PNG महागला! मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती रुपयांनी वाढले दर?

सुवर्णपदक विजेत्या 17 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूचा अपघातात मृत्यू; क्रीडा क्षेत्रावर शोककळा

Maharashtra News Live Update: मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेकडील शंकरवाडी परिसरात अचानक आग

छटपुजेच्या नावाखाली नदीपात्रात मातीचा डोंगर; प्रशासन गप्प का? बदलापुरात संतापाचा उद्रेक!

Vastu Tips: किचनमध्ये वॉटर प्युरिफायर कोणत्या दिशेला लावावा? वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींच्या जवळ चुकूनही लावू नका

SCROLL FOR NEXT