petrol- diesel Saam TV
लाईफस्टाईल

इकडे लक्ष द्या! तुमच्या खिशातील 25 टक्के रक्कम होतेय फक्त इंधनावर खर्च!

ग्रामीण भागात तर अनेकांनी आता गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: सध्या पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी या सर्व इंधनांची किंमत गेल्या काही दिवसांत  झपाट्याने वाढली आहे. जगातील सर्वात महाग एलपीजी सध्या भारतामध्ये मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. मागील काही दिवसांत इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झालीय, घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एल पी गॅस ची किंमत हजाराच्या घरात जाऊन पोहोचली आहे.  ग्रामीण भागात तर अनेकांनी आता गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.

२०१४ नंतर एलपीजी सिलिंडरच्या किमतीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. आजच्या घडीला दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत विचार केला तर आपल्याला खरेदी करावा लागणारा एलपीजी किंवा पेट्रोल आणि डिझेल हे जगातील सगळ्यात महाग दरांमध्ये येतात. दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत विचार केल्यास देशातील नागरिक एलपीजी सिलिंडरसाठी जगात सर्वाधिक किंमत मोजताहेत, एलपीजीसाठी भारताला आंतरराष्ट्रीय डॉलरमध्ये ३.५ डॉलर मोजावे लागतात. इंधनाच्या दरावर सरकारने नियंत्रण आणावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे

इंधनाची किंमत इतकी जास्त आहे की आपल्याकडे एखादा नागरिक दिवसभरातील जे उत्पन्न जे कमावतो त्यापैकी सर्वाधिक खर्च हा इंधनावर होतो, म्हणजेच समजा एक अमेरिकन नागरिक एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा त्याची किंमत ही त्याच्या दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या ०.६ टक्के एवढी असते.

स्पेनमध्ये ही किंमत उत्पन्नाच्या २.२ टक्के असते. जेव्हा भारतातील नागरिक गाडीत एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा तो त्याच्या दिवसभरात एकूण उत्पन्नाच्या २३.५ टक्के इतकी किंमत मोजत असतो, तो डिझेलसाठी २०.९ टक्के व एलपीजीसाठी १५.६ टक्के किंमत मोजत आहे. म्हणजेच जर भारतीय नागरिक दिवसाला १०० रुपये कमावत असेल तर त्याला एक लिटर पेट्रोलसाठी २३ रुपये खर्च करावे लागतात. याचा अर्थ रोजच्या पगारातील 25 टक्के रक्कम ही इंधनावर खर्च होते आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT