Abdominal Pain In Women Saam Tv
लाईफस्टाईल

मासिक पाळीमुळेच नाही, तर 'या' कारणांमुळे महिलांमध्ये होऊ शकते पोटदुखी...

जेव्हा जेव्हा महिलांना पोटदुखी होते तेव्हा बहुतांश महिलांना असे वाटते की त्यांना मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) कारणामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु मासिक मासिक पाळीमुळेच नेहमी वेदना होतात असे नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांच्या पोटदुखीची कारणे: जेव्हा जेव्हा महिलांना पोटदुखी होते तेव्हा बहुतांश महिलांना असे वाटते की त्यांना मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) कारणामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु मासिक मासिक पाळीमुळेच नेहमी वेदना होतात असे नाही. त्यांना अनेक कारणांमुळे पोटात वेदना होऊ शकतात. जाणून घेऊयात-

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येमुळेही पोटदुखी होते;

बर्‍याच वेळा स्त्रियांना ओव्हेरियन सिस्ट असल्यास, पोट फुगणे, अनियमित मासिक पाळी येणे, खालच्या ओटीपोटात दुखणे अश्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा सिस्ट फुटते तेव्हा तीव्र वेदना होऊ शकतात. ओवेरियन सिस्टच्या बाबतीत, लक्षणे लक्षात दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. ओवेरियन सिस्ट ही एक द्रवाने भरलेली पिशवी आहे जी स्त्रियांच्या एक किंवा दोन्ही अंडाशयांमध्ये तयार होऊ शकते. हा एक सामान्य आजार आहे जो कोणत्याही महिलेला होऊ शकतो.

यूरिनरी ट्रॅकच्या इंफेक्‍शनमुळे होऊ शकतो त्रास;

याशिवाय युरिनरी ट्रॅक्टच्या इन्फेक्शनमुळेही महिलांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. ही सामान्य समस्या आहे. यामध्ये यूटीआयमध्ये मूत्रपिंड, गर्भाशय, मूत्राशय, मूत्रमार्गाचा संसर्ग होतो. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्येचा सामना जास्त करावा लागतो. या समस्येमध्ये तुमच्या पोटाच्या खालच्या भागात दुखू शकते.

गर्भपात झाल्यानंतरही वेदना होतात;

याशिवाय, गर्भपात किंवा गर्भपाताच्या वेळी 20 व्या आठवड्यापूर्वी गर्भाचा मृत्यू होतो. गर्भपात झाल्यास, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, खूप रक्तस्राव होणे, पाठदुखी, ताप अश्या समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT