Little grebe, Tibukali ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

दुर्मिळ पण कबुतरासारखा दिसणारा टिबुकली पक्षी

पावसाळ्यात आपल्या अनेक नवनवीन पक्षी पाहण्यास मिळतात.

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाच्या हलक्या कोसळणाऱ्या सरी, निसर्गरम्य दृश्य, हिरवळ, गारवा व अनेक नवनवीन येणारे पक्षी. ऋतूमानानुसार पक्षी स्थालंतरीत करत असतात.

हे देखील पहा -

पावसाळ्यात येणारे पक्षी हे विलोभनीय असतात पण तितकेच त्याच्यासाठी खडतरही असते. पावसाळ्यात आपल्याला अनेक पक्षी पाहायला मिळतात त्यापैकी एक टिबुकली. टिबुकली हा पक्षी गुबगुबीत असा साधारण कबुतराएवढा पाणपक्षी आहे. ज्याच्या पाठीचा भाग भुऱ्या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढऱ्या रंगाचा, शेपटी नसलेला, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी आहे. या पक्षांमध्ये नर व मादी सारखे दिसायला असतात. टिबुकली हा पक्षी जन्माला आल्यानंतर लगेच पाण्यात पोहायला लागतात व पुढपर्यंत जाऊन पुन्हा पाण्यातून बाहेर येतात.

टिबुकली हा पक्षी (Birds) आकाराने छोटा असून पाणकीटक, बेडूक, अळ्या व इतर छोटे जलचर खाणारा पक्षी आहे. तसेच त्याचे घरटे हे पाण्यात (Water) तरंगणारे व छोटे असते. हा पक्षी भारतासह, बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार व पाकिस्तान येथे जोडीने किंवा लहान-मोठ्या थव्यात, तलांवात किंवा नदीजवळ आढळून येतात.

टिबूकली हा पक्षी समुद्रसपाटीपासून सुमारे २५०० मीटर उंचीपर्यंत सर्व ठिकाणी यांचे वास्तव्य असते. रंगावरुन व आकारावरून या पक्ष्याच्या किमान नऊ उपजाती आहेत. त्यापैकी भारतात आढळणारी एकमेक उपजात टाकीबॅप्टस रुफिकोलिस कॅपेन्सिस ही आहे. याचा प्रजनन काळ हा एप्रिल ते ऑक्टोबर असून टिबुकली मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते. अंडी देण्यापासून ते पिलांच्या वाढीपर्यंत नर व मादी त्याचे योग्यरित्या संगोपन करतात. तसेच यात मोठी टिबुकली पण आढळून येतात. परंतु, मोठी टिबुकली ही दुर्मिळ प्रमाणात आढळतात. उत्तर व मध्य भारतात, सिंध ते आसाम, मणिपूर व कच्छ याठिकाणी हे पक्षी स्थलांतर करतात. यंदा हा टिबुकली पक्षी पाझर तलावा जवळ आढळून आला आहे.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT