Simple tips for bitter gourd Recipe, Kitchen tips and Tricks in Marathi, karlyachi bhaji kashi banvaychi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स

आपल्यापैकी अनेकांना कारले खाण्यास आवडते पण त्याच्या कडवटपणामुळे आपण ते खाणे टाळतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : चवीने कडू असणाऱ्या कारल्यात अनेक गुणधर्म आहेत. आपल्यापैकी अनेकांना कारले खाण्यास आवडते पण त्याच्या कडवटपणामुळे आपण ते खाणे टाळतो. (Kitchen tips and Tricks in Marathi)

हे देखील पहा -

कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे (Vitamins) असतात. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होते. डायबिटीज, रक्त शुद्धीकरण यासह इतर अनेक आजारांवर कारले खूप फायदेशीर आहेत. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी या टिप्स (Tips) फॉलो करा.

या पदार्थांचा वापर करुन कारल्याचा कडवटपणा घालवा

१. कारल्याचा कडवटपणा काढण्यासाठी कारले कापून त्याला रात्रभर मीठात टाकून ठेवा. कारले बनवण्याआधी मीठात ठेवलेले कारले नीट धुवून नंतर त्याची भाजी करा. कारल्याचा कडूपणा बर्‍याच प्रमाणात निघून जाईल.

२. कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी ते बनवण्यापूर्वी त्यांचे लहान - लहान तुकडे करा व एक तास दह्यात भिजत ठेवा. असे केल्याने कारल्याची भाजी खाताना त्यात कडूपणा जाणवणार नाही.

३. कारल्याच्या भाजीत घरात असणाऱ्या मसाल्याचा वापर करुन त्याचा कडूपणा काही अंशी आपण कमी करु शकतो. कारल्याची साधी भाजी करताना त्यात कांदा, बडीशेप किंवा शेंगदाणे घाला. भाजीमध्ये या गोष्टींचा वापर केल्यास कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते.

४. कारल्याचा सर्वात जास्त कडूपणा त्याच्या वरच्या सालीमध्ये असतो. अशावेळी कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी आपण त्याच्या वरील साल काढून टाकावे. साल फेकून देण्याऐवजी त्याला मीठ लावून काही वेळ उन्हात वाळवा. यानंतर भरलेले कारले बनवताना सुकवलेल्या सालील मसाला (Spices) घालून तळून घ्या. कारल्यातील कडवटपणा कमी होईल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

SCROLL FOR NEXT