No Sugar Challenge Saam Tv
लाईफस्टाईल

No Sugar Challenge : महिनाभर साखरेचे सेवन न केल्यास आरोग्याला होतील का अनेक फायदे? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

जास्ती साखर खाणे किंवा गोड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

कोमल दामुद्रे

No Sugar Challenge : दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत काही ना काही गोड खातच असतो. सकाळी उठल्याबरोबर आपण साखरेचा गोड चहा पितो. जास्ती साखर खाणे किंवा गोड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

भारतातील लोकांना जास्ती गोड पदार्थ खाण्याची आवड आहे कोणताही सण असला की, अगोदर गोड काहीतरी बनवून आपण तो सण साजरा करतो. मिठाई,चॉकलेट,केक, आइस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स, चहा अशा गोड पदार्थांचे सेवन करायला भारतील लोकांना खूप आवडते.

त्यामुळे जास्ती लोकांना मधुमेह (Diabetes) टाईप २, हृदय संबधित,ब्लड प्रेशर असल्या आजारांना बळी पडावे लागते. परंतु जर तुम्ही १ महिना साखरेचे (Sugar) सेवन केलेच नाही तर त्याचे फायदे कसे होतील जाणून घ्या

1. वजन कमी होईल

गोड पदर्थांमध्ये फायबर, प्रोटीन चे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्याला (Health) काही फायदा (Benefits) होत नाही. गोड खाल्याने पोटाची चरबी वाढते. त्यामुळे ज्या पदर्थांमध्ये साखर नाही असे पदर्थाचे सेवन केल्यावर तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

No Sugar Challenge

2. हृदय निरोगी राहील

जेव्हा शुगरचे फॅटमध्ये रूपानंतर होते तेव्हा रक्तात घाणेरडे कॉलेस्ट्रॉल जमा होते त्यामुळे बीपी हाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होऊन हृदयविकराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे तुम्ही जर साखर खाण्याचे प्रमाण कमी केले तर तुमचे हृदय निरोगी राहील.

3. लिव्हरला फायदा होईल

जर तुम्ही जास्ती साखर खात असाल तर तुमच्या लिव्हरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.लिव्हरला महत्वाचे ऑर्गन आहे. लिव्हरशी संबधित Non-alcoholic fatty liver disease (NAFLD) हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारात साखरचे प्रमाण खूप कमी असावे.तसेच जर तुम्ही ३० दिवस पूर्णपणे साखर खाणे बंद केली तर तुमच्या पूर्ण आरोग्याला उत्तम फायदा होईल.तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर,आयन मिळून तुम्ही निरोगी राहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT