Corona Fear 
इतर

राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागणार? उद्या सर्वपक्षीय बैठक

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात कोरोनाची Corona स्थिती भयावह होते आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यात शनिवार-रविवारचा लाॅकडाऊन संपला की पुन्हा आठवडाभर लाॅकडाऊन Lock Down लावण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. Maharashtra Heading Towards New Lock Down

राज्यात Maharashtra केंद्राकडून पाठविल्या जाणाऱ्या कोरोना लसींच्या डोसेसचा Corona Vaccine तुटवडा असल्याने राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण थांबवावे लागत आहे. एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भयावर प्रमाणात वाढते आहे. कोरोनाचे मृत्यूही वाढत आहेत. कोरोनाच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरणाऱ्या रेमडिसीवीर Remdesivir इंजेक्शनचा तुटवडाही आहे. त्यातच कोरोना लशींचाही तुडवडा निर्माण झाल्याने सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे. 

राज्यातली वाढती रुग्णसंख्या आणि कडक निर्बंध लादूनही परिस्थितीत बदल नाही. त्यामुळे कोरोना बाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत उद्या पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकार लॉक डाऊनच्या बाबत विचार करत असल्याची चर्चाआहे. उद्या बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील Jayant Patil विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis, चंद्रकांत पाटील मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Heading Towards New Lock Down

दरम्यान, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या रविवारी (ता. ११ एप्रील) होणारी एमपीएससीची MPSC Exam परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही परिक्षा पुन्हा केव्हा होणार, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT