Vinesh Phogat Saam Tv
Image Story

Vinesh Phogat: विनेश फोगाटबद्दल 'या' गोष्टी अनेकांना माहित नाही; PHOTO

Vinesh Phogat Created History In Paris Olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट तिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीने पुन्हा चर्चेत आलीय. आज आपण विनेश फोगाटचा प्रवास जाणून घेवू या.

Rohini Gudaghe
Vinesh Phogat struggle

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने ६ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळवले. विनेशने महिला कुस्ती ५० किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलमध्ये चमकदार कामगिरी केलीय.

Wrestler Vinesh Phogat

प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिने प्रथम विश्वविजेता आणि गतविजेता युई सुसाकीचा पराभव केला. विनेश जपानच्या सुसाकीला पराभूत करणारी जगातील पहिली महिला कुस्तीपटू ठरलीय.

Vinesh Phogat news

यानंतर उपांत्यपूर्व फेरीत विनेशचा सामना माजी विश्वविजेती युक्रेनच्या ओक्साना लिवाचसोबत झाला होता. यामध्ये तिने चमकदार कामगिरी करत सामना जिंकला. विनेश फोगाटचे नाव आघाडीच्या महिला कुस्तीपटूंमध्ये गणले जाते.

Vinesh Phogat look

विनेश भारतीय कुस्तीपटूंपैकी एक आहे. तिचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील बलाली गावात झाला होता. तिचं घराणं कुस्तीपटूंचं होतं.

Vinesh Phogat story

विनेश नऊ वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. विनेशचे काका महावीर सिंग फोगाट यांच्याकडून विनेशने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. ते महिला कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगाट यांचे वडील आहेत.

Vinesh Phogat struggle

विनेशने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये महिलांच्या ४८ किलो फ्रीस्टाइल प्रकारात पदार्पण केलं होतं. यानंतर विनेश फोगाटने टोकियो ऑलिम्पिक २०२० साठी पात्रता मिळवली होती.

Vinesh Phogat journey

विनेश फोगाटने आतापर्यंत जागतिक स्तरावर कुस्तीमध्ये अनेक पदके आणि रेकॉर्ड जिंकले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT