Raigad Fort Travel Guide, meta ai
Image Story

Shivrajyabhishek 2026: राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाताय? मुंबई-पुण्याहून कसे पोहोचाल, किती येईल खर्च? जाणून घ्या एका क्लिकवर

Raigad Fort Tourism: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त रायगड किल्ल्यावर हजेरी लावतात. तुम्हीही राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाण्याचा विचार करत असाल, तर प्रवास, खर्च आणि इतिहासाबाबतची ही माहिती उपयोगी पडेल.

Sakshi Sunil Jadhav
Shivaji Maharaj Coronation Day

रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व

रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होता. 6 जून 1674 रोजी याच गडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्यामुळे रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं.

Raigad Rajyabhishek Ceremony

मुंबईहून रायगडावर कसे जाल?

मुंबईहून रायगडाचं अंतर सुमारे 170 ते 180 किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गाने महाडमार्गे पाचाड गाव गाठता येतं. तुम्हाला कारने 4 ते 5 तास लागतील.

Mumbai to Raigad Travel

पुण्याहून रायगडावर जाण्याचा मार्ग

पुण्याहून रायगडाजवळ जवळपास130 ते 140 किलोमीटर अंतर लागतं. ताम्हिणी घाट किंवा भोर-वरंधा घाटमार्गे प्रवास तुम्ही करू शकता. 3.5 ते 4.5 तासांचा हा प्रवास असेल.

Pune to Raigad Route

एसटी बसची सुविधा उपलब्ध

मुंबई, ठाणे, पुणे आणि महाडजवळून रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडपर्यंत एसटी बस सेवा उपलब्ध असते. राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान विशेष बसही सोडल्या जाऊ शकतात. तर तुम्ही तिथे रोपवेचाही वापर करू शकता. याने काही मिनिटांतच गडमाथ्याजवळ पोहोचता येतं.

Pune to Raigad Route

गडावर पायी चढाईचा अनुभव

रायगडावर जाण्यासाठी जवळपास 1,700 हून जास्त पायऱ्या आहेत. तुम्ही 1.5 ते 2 तासांत गड चढता येतो. तर खर्च हा अंदाजे मुंबई-पुण्याहून एसटी प्रवासाचा ₹400 ते ₹800 होईल. खासगी वाहन इंधन खर्च हा ₹1,500 ते ₹3,000 रुपये होईल. रोपवेचं तिकीट हे अंदाजे ₹300 ते ₹500 प्रति व्यक्ती होईल. जेवणाचा आणि इतर खर्च ₹300 ते ₹1,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एकूण खर्च प्रति व्यक्ती ₹1,000 ते ₹3,500 दरम्यान येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींच्या शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत अजितदादांच्या जयंतीचा समावेश

Smart Meter Controversy: महाराष्ट्रात लुटीचं स्मार्ट मीटर? स्मार्ट मीटरविरोधात ग्राहक रस्त्यावर

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

SCROLL FOR NEXT