How to Handle Stress At Work SAAM TV
Image Story

Office Stress Relief Tips : कामाचा ताण अन् नैराश्य दूर करायचंय? 'या' टिप्स फॉलो करा, हसत-खेळत जाईल दिवस

Work Stress Relief Tips : ऑफिसच्या ताणापासून दूर राहायचे असेल तर 'या' टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
Office stress

ऑफिस ताण

ऑफिसमध्ये येणारा ताण कमी करायचा असल्यास 'या' सिंपल टिप्स फॉलो करा. यामुळे ऑफिसचा दिवस आनंदात जाईल.

Prioritize work

कामाचा प्राधान्य क्रम ठरवा

ऑफिसमध्ये आपल्याला अनेक काम देतात. मात्र आपण कामाच्या महत्त्वानुसार त्याचा प्राधान्य क्रम ठरवावा. म्हणजे कामाचा जास्त प्रेशर येणार नाही. महत्त्वाच्या कामांची यादी बनवा.

Avoid multitasking

मल्टीटास्किंग टाळा

ऑफिसमध्ये मल्टीटास्किंग टाळा. कारण खूप वेळा मल्टीटास्किंगमुळे एकही काम नीट होत नाही. स्मार्टवर्क करा.

Learn to say no

नाही म्हणायला शिका

आपल्याला कामाचा जास्तच प्रेशर येत असेल तर वरिष्ठांना योग्य वेळी नाही बोला. कारण यामुळे न करायचे काम केल्यास मानसिक ताण वाढतो.

Exercise

व्यायाम

ऑफिसमध्ये आपण जास्त वेळ बसून राहतो. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे वेळ काढून चालायला जा. यामुळे शारीरिक हालचाल होऊन मूड फ्रेश होतो.

Avoid working in a hurry

घाईत काम करणे टाळा

कितीही प्रेशर असले तर घाईत काम करू नये. यामुळे कामात चुका होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे मानसिक आरोग्यावर ताण येतो आणि आपली चिडचिड होते.

Don't overdo it

जास्तीचे काम ओढवून घेऊ नका

बॉसला खुश करण्याच्या नादात जास्तीचे काम अंगावर ओढवून घेऊ नका. काम वाढल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल.

Manage time

वेळेचे व्यवस्थापन करा

ऑफिसमध्ये कामाच्या वेळेचे व्यवस्थापन करा. जेणेकरून ऑफिसात कामाचा ताण येणार नाही.

Break

ब्रेक

कितीही काम असलं तरी जेवणाचा ब्रेक वेळेवर घ्या. यामुळे डोकं चांगल्या प्रकारे काम करू लागते. तसेच मूड देखील फ्रेश होतो.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

SCROLL FOR NEXT