बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध देण्यात येत आहे.
शासनाच्या वतीने ५ हजार रुपयांपासून ते ४ लाख रुपयांपर्यंतचे भरघोस अनुदान दिले जातंय.
याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना' आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी 'बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना' या शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जात आहेत.
या योजनांमधून नवीन सिंचन विहिरीसाठी ४ लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाख रुपये, ठिबक सिंचन संचासाठी ९७ हजार रुपये आणि विद्युत पंप संचासाठी ४० हजार रुपये अनुदान मिळते.
नवीन विहिरीसाठी शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्याकडे सातबारा, ८-अ उतारा, सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे.
संबंधित प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा आणि अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.