राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्ती चांगली वाढ झाली आहे.
अजित पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्य संपत्ती १० कोटींनी वाढ झाली आहे.
२०१९ च्या तुलनेत स्थावर मालमत्तेत १० कोटींनी वाढ झाली असून ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये इतकी झाली आहे.
अजित पवारांची जंगम मालमत्ता ८ कोटी २२ लाख ६८० रुपये आहे. असं प्रतिज्ञापत्रात सांगतिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. बारामती मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहे.
अजित पवार यांच्याविरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे यंदा बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.