आयपीएल २०२४ स्पर्धा ही एमएम धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असणार, असं म्हटलं जात होतं. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी त्याने कर्णधारपदावरुन माघार घेत ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती. आता धोनी पुढील हंगाम खेळणार की नाही? अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
आगामी आयपीएल हंगामापूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या हंगामात जर ४ खेळाडूंना रिटेन करण्याचा नियम लागू केला गेला, तर एमएस धोनीला रिटेन करणं कठीण होऊन जाईल.
माध्यमातील वृत्तानुसार,चेन्नई सुपर किंग्ज संघ एमएस धोनीला रिटेन करण्याची शक्यता खूप कमी आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, मथीशा पथिराना आणि शिवम दुबे यांना रिटेन करु शकतो.
जर रिटेन करण्याची मर्यादा वाढवली, तर धोनीचा रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. जर असं झालं नाही, तर एमएस धोनी मेंटॉरच्या भूमिकेत दिसून येऊ शकतो.
ऑक्शनमध्ये रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या किती असणार? हे ठरवण्यासाठी ३१ जुलै रोजी बीसीसीआयची बैठक पार पडणार आहे. जर खेळाडूंची संख्या वाढवली, तर एमएस धोनी चेन्नईकडून खेळताना दिसेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.