Eco-Friendly Nirmalya Collection  
Image Story

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेश विसर्जनादरम्यान गिरगाव चौपाटीवर निर्माल्य संकलनाचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. संकलित निर्माल्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाणार असून, समुद्र प्रदूषण रोखण्याचा संदेश देण्यात आला.

Shruti Vilas Kadam
Eco-Friendly Nirmalya Collection

गिरगाव चौपाटीवर निर्माल्य संकलन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांकडून निर्माल्य संकलनाचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.

Eco-Friendly Nirmalya Collection

भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

हार, फुले आणि पूजेसाठी वापरलेले अन्य निर्माल्य समुद्रात विसर्जित करण्याऐवजी भाविकांनी ते प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांकडे जमा केले.

Eco-Friendly Nirmalya Collection

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला जात आहे.

Eco-Friendly Nirmalya Collection

पर्यावरणपूरक व्यवस्थापनावर भर

निर्माल्यामध्ये मिसळलेले प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक आणि सजावटीच्या वस्तू समुद्रात गेल्यास जलप्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन केले जाते.

Eco-Friendly Nirmalya Collection

समुद्री जीवसृष्टीच्या संरक्षणाचा संदेश

समुद्रात जाणारे प्लास्टिक आणि इतर अविघटनशील घटक समुद्री जीवसृष्टी आणि जैवविविधतेवर परिणाम करू शकतात. निर्माल्य संकलनामुळे हा धोका कमी करण्यास मदत होते.

Eco-Friendly Nirmalya Collection

निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती

गिरगाव चौपाटीवर संकलित केलेले निर्माल्य पुढील प्रक्रियेसाठी नेण्यात आले. नैसर्गिक घटकांवर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.

Eco-Friendly Nirmalya Collection

श्रद्धेसोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश

पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणाचे रक्षण करता येते, हा संदेश यातून देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा

Matang Samaj Morcha : 'शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही' मुंबईत मातंग समाज आक्रमक

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

SCROLL FOR NEXT