Railway New Service 
Image Story

Railway New Service: दिलासादायक! रेल्वे प्रवासी ताण तणावातून मुक्त होणार, CSMT स्टेशनवर नवी सुविधा सुरू

Railway New Service: मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक नवी सुविधा सुरु केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 'रिलॅक्स झोन'ची सुरुवात करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam
Railway New Service

मध्य रेल्वेचा नाविन्यपूर्ण उपक्रम


मध्य रेल्वेने भाडे-व्यतिरिक्त (नॉन-फेअर रेव्हेन्यू) उत्पन्न वाढवतानाच प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रिलॅक्स झोन’ची सुरुवात केली आहे.

Railway New Service

प्रवाशांच्या आरामावर विशेष भर


दीर्घ प्रवासामुळे थकलेल्या प्रवाशांना आराम मिळावा, यासाठी ही सुविधा खास तयार करण्यात आली असून, येथे प्रवाशांना ताजेतवाने अनुभव मिळतो.

Railway New Service

अत्याधुनिक मसाज खुर्च्यांची सुविधा

रिलॅक्स झोनमध्ये संपूर्ण शरीरासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मसाज खुर्च्या उपलब्ध असून, त्या स्नायूंचा ताण, थकवा आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.

Railway New Service

स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण

या झोनमध्ये स्वच्छतायुक्त, आरोग्यदायी आणि सुरक्षित आसन व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रवाशांसाठी आरामदायी अनुभव सुनिश्चित केला आहे.

Railway New Service

परवडणाऱ्या दरात जलद मसाज


प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध असून, मसाज सत्रांची सुरुवात केवळ ९९ रुपयांपासून होते.

Railway New Service

प्रवासाआधी व प्रवासानंतर उपयुक्त


प्रवास सुरू करण्यापूर्वी किंवा प्रवासानंतर आराम मिळवण्यासाठी हा रिलॅक्स झोन एक उत्तम पर्याय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT