Arvind Kejriwal Net Worth Facebook
Image Story

Arvind Kejriwal Net Worth: अरविंद केजरीवाल कोट्यधीश, पण स्वतःचं घर नाही; एकूण संपत्ती किती?

AAP leader Arvind Kejriwal Property: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. केजरीवाल यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीबाबत खुलासा झालाय.

Bharat Jadhav

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते करोडपती आहेत.

अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावावर अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षाही अधिक संपत्ती अथवा मालमत्ता आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती १.७३ कोटी रुपये एवढी आहे. २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ७.२१ लाख रुपये होते.

केजरीवाल यांच्याकडे ५० हजार रुपये रोख आणि २.९६ लाख रुपये बचत खात्यात आहेत. त्यांच्याकडे १.७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची असली तरी त्यांच्या नावावर कुठलेही घर अथवा गाडी नाही.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या आयआरएस अधिकारी होत्या. त्यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत जास्त संपत्ती आहे.

सुनीता केजरीवाल यांची एकूण मालमत्ता २.५ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीची स्थावर मालमत्ता आहे.

यात २५ लाख रुपये किमतीचे ३२० ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि ९० हजार रुपये किमतीची एक किलो चांदी आहे. यासह त्यांच्याकडे १.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

महिलांसाठी खास छोट्या आणि मोठ्या वाट्यांचे मंगळसूत्र; लेटेस्ट ५ ट्रेंडी पॅटर्न

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT