Shukra  Saam Tv
राशिभविष्य

Shukra Ast: धन दाता शुक्र मीन राशीत होणार अस्त; पैसे-करियरबाबत 'या' राशींचे येणार अच्छे दिन

Shukra Ast 2025: शुक्र एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतो. अशा स्थितीत एक पूर्ण राशीचक्र करण्यासाठी शुक्राला 12 वर्षे लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दैत्य गुरु शुक्र ठरलेल्या वेळी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. शु्क्र ग्रहाच्या गोचरमुळे प्रत्येक राशींच्या जीवनावर परिणाम होत असतो. शुक्र एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतो. अशा स्थितीत एक पूर्ण राशीचक्र करण्यासाठी शुक्राला 12 वर्षे लागतात. शुक्र जानेवारीच्या शेवटी मीन राशीत प्रवेश करणार आहे.

यानंतर 19 मार्च रोजी संध्याकाळी 6:49 वाजता शुक्राचा अस्त होणार आहे. मीन राशीत शुक्र अस्त झाल्यामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. तर काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत. शुक्राच्या अस्तामुळे कोणत्या राशींना बंपर फायदे मिळू शकतात ते पाहूयात.

मेष रास

या राशीमध्ये शुक्र बाराव्या भावात प्रवेश करणार असून यावेळी लोकांनाही खूप फायदा होऊ शकणार आहे. अविवाहित लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनावश्यक खर्च करण्यास प्रवृत्त करणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राची अस्त अनेक क्षेत्रात फायदेशीर ठरू शकणार आहे. शुक्र अस्तामुळे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे.

सिंह रास

या राशीमध्ये शुक्र आठव्या भावात अस्त होणार आहे. शुक्र या घरात असल्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. या काळात तुमच्या संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. सासरच्यांशी तुमचे संबंध सुधारणार आहेत. जीवनात आनंदाची खेळी होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Malshej Ghat Closed : माळशेज घाट वाहतुकीसाठी आजही बंद; पर्यटकांचे अतोनात हाल, पर्यायी मार्ग कोणते?

Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा कटलेट; वाचा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT