Shukra  Saam Tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 12 महिन्यांनी शुक्र करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं नशीब चमकून पैसे मिळणार

Venus planet transit : धन, वैभव, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह जेव्हा शुभ स्थितीत असतो, तेव्हा तो व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार, ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्याचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. येत्या काळा शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

सप्टेंबर महिन्यात धन आणि समृद्धीचा कारक शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे गोचर विशेष फायदेशीर ठरू शकणार आहे. या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगला परिणाम होणार आहे.

तूळ रास

शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. शुक्र तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी भ्रमण करणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे.

कर्क रास

शुक्र ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. तुम्ही अनेक मार्गांनी पैसे कमवू शकणार आहात. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकणार आहे. वकील, मार्केटिंग कर्मचारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. अविवाहित लोकांसाठी नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. हा काळ नवीन कल्पना आणि प्रेरणा घेण्यासाठी चांगला असेल.

वृश्चिक रास

शुक्राच्या राशी बदलामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकणार आहे. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्मभावात भ्रमण करणार आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार देखील होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने निर्णय घेता येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

Raw Banana Benefits : पावसाळ्यात कच्च्या केळीची भाजी खाण्याचे 'हे' फायदे तुम्ही वाचलेत का?

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT