Shukra Gochar In makar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' राशींना लागणार मोठा जॅकपॉट

Shukra Gochar In Makar: शुक्र ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे 1 महिन्यानंतर गोचर करणार आहे. शुक्र ग्रहाच्या या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होऊ शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. येत्या काळात शुक्र ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे. शुक्र ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे 1 महिन्यानंतर गोचर करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, नोव्हेंबरमध्ये शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. यावर भगवान शनीचं राज्य आहे. दरम्यान शनी आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. दरम्यान शुक्र ग्रहाच्या या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होऊ शकणार आहे. काही राशींना बक्कळ पैसा मिळणार आहे तर काही राशींना कामात यश मिळेल. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

शुक्राचं गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुम्हाला व्यवसायात भरपूर कमाई करण्याची संधी मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळात चांगलं यश मिळेल.

तूळ रास

शुक्राचा राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुमचं लग्न जुळण्याचे योग आहेत. जमीन आणि संपत्तीशी संबंधित काम करणाऱ्यांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे. नवी नोकरी तुमच्या हाती लागू शकते. वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे.

मकर रास

शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला भविष्यात फायदा होण्यासाठी काम करावं लागेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आहे. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT