Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र बदलणार रास; 'या' राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

Venus Transit In Dhanu: सध्या दिवाळी सुरू असून काही ग्रहांनी या काळात देखील त्यांची रास बदलली आहे. मात्र दिवाळीनंतर देखील शुक्र ग्रह त्याच्या राशीत बदल करणार आहे.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. सध्या दिवाळी सुरू असून काही ग्रहांनी या काळात देखील त्यांची रास बदलली आहे. मात्र दिवाळीनंतर देखील शुक्र ग्रह त्याच्या राशीत बदल करणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी दिवाळीचा १ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी दिवाळीनंतर, 7 नोव्हेंबर रोजी, ऐश्वर्य आणि वैभवाचा दाता शुक्र धनू राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास

शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसंच तुमचं उत्पन्न वाढू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत या काळात निर्माण होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक आणि गुंतवणुकीच्या बाबतीत लाभ मिळू शकणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर शुभ ठरणार आहे. तुमची प्रलंबित काम पूर्ण होणार आहेत. तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला अनपेक्षित यश मिळू शकणार आहेत. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

मिथुन रास

शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं असणार आहे. अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकणार आहे. गुंतवणूकीतून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: दिवाळीच्या दिवसात घरात सुख समृद्धी येण्यासाठी 'या' वास्तु टिप्स फॅालो करा

Bigg Boss 18 : कन्फेशन रूममध्ये मोठा खुलासा! बिग बॉसने ईशाला दाखवला रजतचा खरा चेहरा

IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा 'फुसका बार'; ऋतुराज 'गोल्डन डक', अख्खा संघ 107 धावांवर तंबूत

Mehndi Design: दिवाळी सणानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या डिझाइन्स

Kalyan Assembly Election: कल्याणमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार, दिग्गज नेत्यासह मतदारांची डोकेदुखी वाढणार

SCROLL FOR NEXT