Venus Transit In Libra saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: ५ दिवसांनी शुक्र ग्रह 'या' राशींच्या आयुष्यात आणणार वादळ; वैवाहिक जीवनात होणार उलथा-पालथ, सावध व्हा

Venus Transit In Libra: १८ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह गोचर करणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींवर संकटं येण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शास्त्रानुसार, सौंदर्य, सुख-सुविधा आणि प्रेम यांचा कारक शुक्र ग्रह आहे. असं मानलं जातं, ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती कमजोर असते, त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, १८ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह गोचर करणार आहे. या ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींवर संकटं येण्याची शक्यता आहे.

मीन रास

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या राशींच्या व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतो. तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला सावध रहावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी शुक्राचं गोचर शुभ राहणार नाही. आरोग्यासंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून तुमची बदनामी होण्याचा धोका आहे. कोणीतरी तुमच्याविरूद्ध कट रचू शकतो.

वृषभ रास

या राशींच्या व्यक्तींना शुक्राच्या गोचरमुळे नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला यश मिळणं कठीण आहे. तुमची नोकरी जाण्याचा धोकाही आहे. आर्थिक बाबतीत तुमचं नुकसान होण्याचा धोका असतो. वैवाहित जीवनात उलथा-पालथ होण्याचा धोका आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT