Venus Turns Direct saam tv
राशिभविष्य

Shukra Margi: 13 एप्रिलपासून चमकणार 'या' राशींचं भविष्य; शुक्राच्या मार्गी चालीने घरात येणार छप्परफाड पैसा

Shukra Margi 2025: एप्रिल महिन्यात शुक्र ग्रह आपली दिशा बदलत मार्गी होणार आहे. म्हणजेच, तो थेट मार्गाने गती करत राशींवर आपला प्रभाव टाकेल. या खगोल बदलाचा तीन विशिष्ट राशींवर मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात शुक्र हा एक अतिशय विशेष ग्रह मानला जातो. कारण शुक्र ग्रह हा संपत्ती, वैभव, समृद्धी, विलासिता आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. ज्यावेळी शुक्र ग्रहाच्या हालचालीत बदल होतो त्यावेळी प्रत्येक राशीवर त्याचा परिणाम दिसून येतो.

एप्रिलमध्ये शुक्र ग्रह मार्गी होणार आहे. म्हणजेच तो सरळ चाल चालणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे अचानक आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना चांगला लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

शुक्राची थेट हालचाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला उपजीविकेच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकणार आहेत. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसून येणार आहे. तुमचं प्रेम जीवन देखील यावेळी चांगले राहणार आहे. करिअरमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. या काळात व्यापाऱ्यांना चांगल्या ऑर्डर मिळू शकतात.

धनु रास

शुक्राची थेट हालचाल धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या वेळी तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकणार आहे. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

कुंभ रास

शुक्राची थेट हालचाल कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. तुम्हाला नातेसंबंधांमध्येही चांगले परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही व्यवसायिक असाल तर तुम्हाला नवीन करार आणि करारांचा फायदा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT