shukra shani yuti saam tv
राशिभविष्य

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Shukra Shani Yuti 2024: ज्योतिष्य शास्त्रामध्ये नवग्रहांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. न्यायाधीश शनिसोबत शुक्राचा संयोग तयार होणार असून यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी चांगल्या संधी मिळणार आहेत ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये नवग्रहांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. हे ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. शुक्र आणि शनि हे दोन्ही एकत्र 5 राशींवर कृपा करणार आहेत.

सुख, समृद्धी आणि संपत्ती देणारा शुक्र लवकरच त्याच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी शुक्राचा संयोग फल देणाऱ्या शनिसोबत होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:12 वाजता धन, समृद्धी आणि सौंदर्याचा स्वामी शुक्राचं गोचर होणार आहे. अशा स्थितीत न्यायाधीश शनिसोबत शुक्राचा संयोग तयार होणार असून यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी चांगल्या संधी मिळणार आहेत ते पाहूयात.

मेष रास

शुक्र आणि शनीची युती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शनीच्या राशीत शुक्र प्रवेश केल्याने तुम्हाला कामात यश मिळणार आहे. येणारा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळू शकणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी शुक्राच्या गोचरमुळे शनीचा संयोग होणार असून तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला कामात यश मिळणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. धनवृद्धीसोबतच तुम्हाला व्यवसायात विशेष लाभही मिळतील. आर्थिक लाभ मिळू शकाल.

मकर रास

मकर राशीसाठी शुक्र आणि शनीचा संयोग चांगला ठरणार आहे. या काळात प्रलंबित कामं पूर्ण होतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने काम करावे लागणार आहे. नोकरदारांचे पगार वाढू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं

Sev puri chutney recipe: शेवपुरीसाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत तिखट चटणी कशी तयार कराल?

भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर भडकलेल्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT