Budh-Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Budh-Shukra Gochar: पितृ पक्षात होणार बुध-शुक्राचं गोचर; व्यापारातून 'या' राशींना मिळणार भरपूर पैसे

Budh And Shukra Gochar: यंदाच्या वर्षी पितृ पक्ष १६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यामध्ये शुक्र आणि बुध या दोन्ही ग्रहांचं गोचर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अनंत चतुर्दशीनंतर पितृ पक्ष सुरु होणार आहे. या पितृ पक्षामध्ये ग्रहांची स्थिती कशी असणार आहे ते पाहूयात. यंदाच्या वर्षी पितृ पक्ष १६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. पितृ पक्ष ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा मानला जातो.

यंदाच्या वर्षी पितृ पक्षात शुक्र आणि बुध या दोन्ही ग्रहांचं गोचर होणार आहे. 16 सप्टेंबर रोजी शुक्र कन्या राशीतून स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. 23 सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

शुक्र आणि बुधाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. विवाहित लोकांचं आयुष्य चांगलं राहणार आहे. भौतिक सुखासाठी वस्तूची खरेदी करणार आहात. तुमच्या संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि बुधचे राशी बदल अनुकूल ठरू शकतात. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

कर्क रास

शुक्र आणि बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी हा काळ अधिक शुभ राहणार आहे. नवीन ओळखीतून भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचंही सहकार्य मिळेल. यावेळी, तुमच्या आईशी तुमचं नातं मजबूत राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

SCROLL FOR NEXT