Horoscope Today 4 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Todays Horoscope: 'या' राशींवर होणार शनीदेवाची कृपा; प्रगतीचे नवे मार्ग मिळणार, तुमच्या राशीत काय?

Rashi Bhavishya 4 June 2024: आज दिनांक ४ जून २०२४ आहे. आज कुणाच्या राशीत काय लिहिलंय? ते जाणून घेऊ या.

Anjali Potdar

आजचे पंचांग ४ जून २०२४

वार- मंगळवार, दिनांक- ४ जून २०२४, महिना- वैशाख कृष्ण त्रयोदशी, नक्षत्र- भरणी, योग- शोभन, करण- गरज, रास- मेष, भौमप्रदोष. दिनविशेष- त्रयोदशी वर्ज्य.

मेष- आरोग्यासाठी चांगला दिवस

आरोग्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनामध्ये आशावाद पेरला जाईल. त्या पद्धतीने काम कराल. आनंद घ्याल आणि वाटाल सुद्धा.

वृषभ- तणावाचा आज दिवस.

कामाचे ताण तणावणाचा आज दिवस आहे. मनस्वास्थ्य जपून महत्त्वाची कामे शक्यतो आज करावीत. खर्चाला आळा घाला. मानसिक स्वास्थ जपा.

मिथुन- प्रगतीच्या दिशेने वाटचाल

नवीन परिचयामध्ये बेरीज होणार आहे. अनेकांचे सहकार्य आज कामामध्ये लाभेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल.

कर्क- समाजकारण, राजकारणात यश

कार्यक्षेत्रामध्ये हिरीरीने भाग घ्याल. अनेक गोष्टी मनासारख्या घडतील. मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. समाजकारण, राजकारणात यश मिळेल.

सिंह- उपासनेसाठी दिवस चांगला

आज भौमप्रदोष आहे. उपासनेसाठी आजचा दिवस चांगला. विशेष उपासना मंगळाची अर्थात गणपतीची केल्यास पुढील काही दिवसांसाठी त्याचे फळ उत्तम मिळेल.

कन्या - खर्च वाढेल

खर्च आटोक्यात ठेवायला लागेल. आलेल्या पैसा जाण्यासाठी वाटा भरपूर आहेत. त्यामुळे त्याच्यावर विशेष लक्ष द्या.

तूळ -कामासाठी प्रवासाचा योग

कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडतील. कामासाठी प्रवासाचा योग आहे. कोर्टकचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - सहकार्याची अपेक्षा करू नका

कोणाचे सहकार्याची अपेक्षा न करता आपण आपले काम केले तर बरे राहील. वेळ पैसा दोन्ही वाया जातील. म्हणूनच आपले हाताखालचे लोक यांच्याशी संधान बांधून पुढे चला.

धनु - प्रदोष उपवास करा.

आज दिवस उपासनेसाठी खूप चांगला आहे. कुलस्वामिनीची उपासना, गणपतीची उपासना करा. |ओम् भौमाय नमः |या जपाची कमीत कमी एक माळ करा. त्याचे फलित छान मिळेल. प्रदोष उपवास करावेत.

मकर - कामानिमित्त प्रवास होतील

उत्साह उमेद वाढवणाऱ्या काही घटना घडणार आहेत. कामानिमित्त प्रवास होतील. घरचे वातावरण बरे राहील.

कुंभ- नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती

जिद्दीने कामात पुढे चला. नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती राहील.आपली ताकत दाखवण्याचा आजचा आपला दिवस आहे.

मीन- दिवस चांगला

जुनी येणी काही असतील, तर ते आज वसूल होतील. आर्थिक लाभाचेप्रमाण सुद्धा समाधानकारक राहणार आहे. आवकजावक यांचा ताळमेळ साधल्यामुळे दिवस चांगला आहे, असं वाटेल.

ज्योतिषाचार्य सौ अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

SCROLL FOR NEXT