Daily Horoscope Today 12 July 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतं नुकसान

Daily Horoscope Today 12 July 2024 : दररोज प्रत्येकाचा दिवस ग्रहमानाच्या स्थितीनुसार जातो. आज कुणाच्या राशीमध्ये काय भविष्य लिहिलंय, ते आपण जाणून घेऊयात.

Anjali Potdar

मेष : तब्येतीच्या तक्रारी वाढतील

हाताखालील लोकांपासून जरा सावधगिरीने राहण्याचा आज संदेश आहे. खूप कामे पेंडिंग पडतील. त्यामुळे त्रस्त होऊन जाल. तब्येतीच्या तक्रारी वाढतील.

वृषभ : धनलाभाची शक्यता

क्रीडा क्षेत्रात प्रगती होण्याचा आजचा दिवस आहे. प्रणयी विचार मनात येतील. त्यामुळे असे नाते असल्यास त्यातून सुख मिळेल. धनलाभाची शक्यता.

मिथुन : आज पैशाचे व्यवहार होतील

"दाम करी काम" हे आज लक्षात येईल. खरेदी असो, घरासाठी खर्च, कुटुंबीयांची मन राखणे यासाठी आज पैशाचे व्यवहार होतील. काही वेळेला "सुखात मीठाचा खडा तर नाही ना" पडत अशी चिंता राहील.

कर्क : दिवस यशस्वी राहील

बुद्धीने आणि शारीरिक क्षमतेने पुढे जाल. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी आपल्याकडे असल्यामुळे दिवस यशस्वी राहील. पत्रव्यवहार मार्गी लागतील.

सिंह : कुटुंबीयांची साथ मिळेल

मोठी गुंतवणूक करणे याच्यासाठी दिवस चांगला आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी चे व्यवहार निकालात निघतील. कुटुंबीयांची साथ मिळेल.

कन्या : मनासारख्या घटना घडतील

आरोग्य चांगले राहील. मनासारख्या घटना घडताना दिसतील. त्यामुळे शरीरस्वास्थ आणि मनस्वास्थ्य दोन्ही चांगले राहणार आहे. दिवस सकारात्मक.

तूळ : मनस्ताप होऊ शकतो

कोणत्याही बंधनात आज अडकू नका. कोणाला काही वचन देऊन दुसऱ्याला त्यात गुंतवून ठेवू नका. कदाचित त्यामुळे आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक : आज इच्छेला प्राधान्य द्या

इच्छा आणि भावना यातील फरक ओळखा. आज इच्छेला प्राधान्य द्या. तरच त्या घटना घडताना दिसतील. सर्वांच्या सहकार्याने पुढे जाल .

धनु : कष्ट व मेहनत कराल

कामाचे शिवधनुष्य आज उचलावे लागेल. त्यासाठी अधिक कष्ट व मेहनत कराल. राजकारणात समाजकारणात यश मिळण्याचा आजचा दिवस आहे.

मकर : भगवंताची विशेष कृपा राहील

प्रवासाने आयुष्यातील अनेक टप्पे पादाक्रांत कराल. भगवंताची विशेष कृपा आज राहील. त्याकडे सकारात्मकतेने पहा.

कुंभ : दिवस थोडा अडचणीचा

दिवस थोडा अडचणीचा राहील. म्हणून काळजी घ्या. खूप अपेक्षा ठेवून आयुष्यात घटना घडत नाही तर त्याच्याशी दोन हात करावे लागतात. गुप्तशत्रूंवर मात कराल.

मीन : मोठे व्यवहार पार पडतील

मोठे व्यवहार पार पडतील. कोर्टाच्या कामात यश मिळताना दिसेल. कामासाठी प्रवासही घडतील. दिवस खूपच सत्कारणी लागेल.चांगल्या गोष्टी देऊन जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT