Saturn Planet Gochar In Kumbh saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: 2025 पर्यंत शनीदेव 'या' राशींना ठेवणार सुखात; कामात यशासोबत मिळणार अपार धन

Saturn Planet Gochar In Kumbh: वैदिक शास्त्रानुसार, सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह हा शनी आहे. शनीच्या गोचरमुळे कोणत्या राशींना चांगला लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये परिवर्तन करतात. यावेळी सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह म्हणजे शनी देव. शनी देव साधारण अडीच वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो.

जानेवारी २०२३ मध्ये शनीदेवाने त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश केला होता. यावेळी २०२५ पर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या घरी सुखाचे क्षण येणार आहेत. तर काही लोकांना या काळात पैसे मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

शनिदेवाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. गेल्या एक वर्षापासून तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचं गोचर शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात अडकलेले पैसे मिळाल्याने तुमचा निधी वाढणार आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढीची संधी मिळेल. तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळू शकतं.

धनु रास

शनिदेवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मानही वाढू शकणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT