Astrology Google
राशिभविष्य

Retrograde planets : जुलै महिन्यात शनीसोबत ३ ग्रह चालणार वक्री चाल; 'या' ३ राशींना मिळणार करियर-बिझनेसमध्ये चांगली संधी

Saturn retrograde July 2025 career business: शनीच्या या वक्री गतीमुळे आणि त्याच्या स्वतःच्या कुंभ राशीतील स्थितीमुळे, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने काही राशींसाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक कॅलेंडरनुसार, दर महिन्याला कोणते ना कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी जुलैमध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. तर अनेक ग्रह वक्री गतीने जाणार आहेत. येत्या काळात ३ ग्रह एकत्रित वक्री होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, कर्माचा कर्ता शनि, व्यवसायाचा कर्ता बुध आणि नेपच्यून हे वक्री होणार आहेत. म्हणजेच ते उलट दिशेने फिरणार आहे. या ३ ग्रहांच्या स्थितीचा काही राशींचे नशीब चमकू शकते. तसंच या राशींना अचानक धनप्राप्तीसह भाग्याचा योग येत आहेत. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

तुमच्यासाठी शनि, बुध आणि नेपच्यून ग्रहांची वक्री चाल फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या राशीच्या धैर्य आणि शौर्य भावावर बुध वक्री राहणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकणार आहे. या काळात, तुम्हाला भावंडांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनि, नेपच्यून आणि बुध ग्रहाची वक्री गती अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या राशीच्या भाग्य घरात शनि वक्री राहणार आहे. तर लग्नाच्या घरात बुध वक्री राहणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

सिंह रास

तुमच्यासाठी शनि, बुध आणि नेपच्यूनची वक्री गती सकारात्मक ठरू शकणार आहे. बुध तुमच्या राशीपासून उत्पन्न घरात वक्री राहणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar New Rule: 'आधार कार्ड'वर सरकार आणखी मोठा निर्णय घेणार, फोटोकॉपी देण्यावर नियम येणार

अक्षय खन्नाची 'धुरंधर' एन्ट्री, Hook step वर सगळेच फिदा; व्हायरल गाणं नेमकं कुठलं?

Kolhapur News: कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात गोंधळ; दोन तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी|VIDEO

Maharashtra Live News Update: सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार

Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

SCROLL FOR NEXT