Dussehra 2024 Horoscope saam tv
राशिभविष्य

Dussehra 2024 Horoscope: विजयादशमीला बनले हे शुभ संयोग; 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण

Surabhi Jagdish

आज १२ ऑक्टोबर म्हणजेच दसरा आहे. विजयादशमी हा दिवस हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक यासाठी मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार देखील हा सण खूप खास मानण्यात येतो. आजच्या या दसऱ्याच्या दिवशी अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे आज दसऱ्याच्या दिवशी काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य उजळू शकणार आहे.

दसऱ्याला बनले शुभ योग

आज दसरा अजून या दिवशी शश आणि मालव्य राजयोग तयार झाला आहे. त्याचप्रमाणे श्रावण नक्षत्रही असणार आहे. सर्व 12 राशींपैकी 3 राशींसाठी हा योग अतिशय शुभ मानला जातोय. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे, ते पाहूयात.

वृषभ रास

आजच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. जुनी कामं तुम्हाला भविष्यात लाभ देणार आहेत. आतापर्यंत अडकलेले प्रकल्प सुरू होणार आहेत. नोकरदारांसाठी काळ अनुकूल असणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी इतरांचं पूर्ण सहकार्य मिळेल. काही लोकांचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहे. ज्या कामात तुम्ही मेहनत कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांच्या करिअरसाठी काळ चांगला आहे. जुन्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते पैसे मिळू शकणार आहेत. अविवाहितांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकणार आहे. याशिवाय जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवी चांगली ऑफर मिळू शकते. तुम्हाला काही नवीन जबाबदारीही मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitthal Mandir : तिरुपती, अयोध्यानुसार पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून चोवीसतास दर्शन

Sayali Sanjeev: अप्रतिम असं मनमोहक सौंदर्य, पाहून घायाळ व्हाल

Diwali 2024 : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला झाडू का पुजतात?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय

Munmun Dutta: तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस अवतार, नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT