december 2024 saam tv
राशिभविष्य

December Horoscope 2024: डिसेंबर महिन्यात 'या' राशींना राहावं लागणार सावध, धनहानीसोबत कुटुंबात होऊ शकतात कलह

December Horoscope 2024: प्रत्येक ग्रहाच्या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. डिसेंबर महिन्यातील ग्रहांच्या राशी बदलाचा कसा परिणाम होणार आहे ते पाहूया.

Surabhi Jayashree Jagdish

डिसेंबर महिना सुरु होणार आहे. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील हा महिना खूप खास मानला जातोय. या महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर आणि स्थितीमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. त्यानुसार, काही व्यक्तींना सतर्क राहावं लागणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. डिसेंबर महिन्यातील ग्रहांच्या राशी बदलाचा कसा परिणाम होणार आहे ते पाहूया. याशिवाय कोणत्या राशींच्या व्यक्तींनी यावेळी सतर्क राहावं ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना डिसेंबरमध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणी येण्याची शक्यता आहे. उगाच केलेला खर्च तुमच्यासाठी अडचणी आणू शकतात. कुटुंबातील कोणाशीही विनाकारण वाद घालू नका.

कर्क रास

डिसेंबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकणार आहेत. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

कन्या रास

डिसेंबर महिना कन्या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. तुम्ही तणावग्रस्त आणि अस्वस्थ राहू शकता. अनावश्यक खर्चापासून अंतर ठेवा. तुमच्याकडून पेसै हरवू शकतात. या काळात तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT