Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या राशींचा शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक आठवड्यात ग्रहांची स्थिती बदलत असते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनावर होतो. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या आठवड्यात, काही महत्त्वाचे ग्रह शुभ स्थितीत येत आहेत

Surabhi Jayashree Jagdish

मेष

सप्ताहात होणारा शनी-मंगळ शुभयोग कर्जाचा ताण कमी करणारा आहे. दूरच्या प्रवासातील अडथळे दूर होतील. घर, जागा खरेदीसाठी कर्ज मंजूर होतील. नोकरीत पदोन्नती मिळेल.

वृषभ

कोर्टकचेरीच्या कामात मोठे यश मिळेल. निवडणुकीत सरशी होईल. मोठ्या स्पर्धेत यश मिळेल. भावंडे-नातेवाइकांशी असलेले मतभेद मिटतील. छोटे प्रवास, सहलीमधून आनंद मिळेल.

मिथुन

नोकरीतील कटकटी कमी होतील. सरकारी कामांना गती मिळेल. हितशत्रूवर मात कराल. नोकरीत पगारवाढ होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. पेन्शन, वारसा हक्काची कामे होतील.

कर्क

शेअर्ससारख्या व्यवसायात अडकलेले पैसे मोकळे होतील. खेळ-स्पर्धेमध्ये मोठे यश मिळेल. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. तरुणांचे विवाह जमतील. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.

सिंह

घर-जागेच्या कायदेशीर कामात यश मिळेल. घर-वाहन दुरुस्ती किंवा पुनर्विकासाच्या कामांना गती मिळेल. परदेशगमनासाठी संधी मिळेल. व्हिसा पासपोर्टच्या कामात यश मिळेल.

कन्या

कोर्टकचेरीमध्ये अनुकूल निर्णय होतील. मोठे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळेल.

तूळ

आर्थिक समस्येवर मार्ग निघेल. नोकरीमधील कटकटी कमी होतील. हितशत्रूवर मात होईल. व्यापारात वृद्धी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात पतप्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीत विजय मिळेल.

वृश्चिक

आरोग्यात सुधारणा करणारा राहील. उत्साह-ऊर्जा वाढेल. कोर्टकचेरी, वाद‌विवादात सरशी होईल. धाडसी निर्णय घ्याल. मुलांच्या समस्या सोडविण्यात यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवसायात अडकलेले पैसे मोकळे होतील.

धनू

शनी-मंगळ शुभयोग कर्जाचा ताण कमी करणारा राहील. कायदेशीर कामात खर्च झाला तरी कटकटी कमी होतील. परदेशगमनासाठीच्या प्रयत्नांत यश मिळेल. अनपेक्षित मोठे लाभ होतील.

मकर

जुनी येणी वसूल होतील. जुने मित्र-नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. कायदेशीर कामात यश मिळेल. निवडणुकीत विजय मिळेल. भागीदारीच्या संवादात मोठा फायदा होईल.

कुंभ

नोकरी-व्यवसायात अनुकूल बदल करणारा राहील. पैशांची चणचण कमी होईल. कौटुंबिक समस्येवर मार्ग निघेल. निवडणुकीत यश मिळेल. परदेशातील नोकरीसाठी अनुकूल काळ राहील.

मीन

कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल. विरोधकांवर मात कराल. धार्मिक विधी, उपासना उत्तम होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल. मोठे मानसन्मान, प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Airport: सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी! १ नोव्हेंबरपासून विमानसेवा दररोज सुरू राहणार; तिकीटाचे दर किती?

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Kia Car Warranty: किआ इंडिया कारची भन्नाट वॉरंटी, आता तुमची कार राहणार जास्त काळ सुरक्षित

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, ४ वर्षांचा प्रवास अखेर थांबला

मिडल क्लास माणूस अब्जाधीश झाला, खात्यात २८१७ कोटी जमा झाले; कारण ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT