Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: 'या' राशींचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर आणि त्यांची स्थिती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. या आठवड्यात काही राशींच्या ग्रहस्थितीमुळे त्यांना कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

नोकरीमध्ये बदलाची इच्छा होईल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

वृषभ

शेअर मार्केटपासून दूर राहणे योग्य ठरेल. प्रेमवीरांना मनस्ताप संभवतो. मित्र-सहकारी वर्गाशी रुसवे-फुगवे होतील. येणी वसूल होण्यात विलंब लागेल.

मिथुन

घर-जागेच्या कामात मनस्ताप संभवतो. ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत वरिष्ठांची मनमानी सहन करावी लागेल. घरापासून दूर बदलीची शक्यता राहील.

कर्क

प्रवासात मनस्ताप संभवतो. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कामातील विलंबामुळे चिडचिड होईल.

सिंह

आर्थिक चणचण भासेल. प्रवास करताना काळजी घ्यावी. डोळे, दात, पायाचे दुखणे त्रास देण्याची शक्यता.

कन्या

वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात पैशांची कामे होतील. नोकरीमध्ये वेतनवाढ होईल.

तूळ

मोठ्या प्रवासाचा बेत रद्द कराल. अनारोग्यामुळे नोकरीत खंड पडेल. नोकरीच्या ठिकाणी मनस्ताप संभवतो.

वृश्चिक

मित्र-सहकारी वर्गाशी दुरावा संभवतो. उत्तरार्धात मोठे खर्च करावे लागतील. दूरचे प्रवास होतील. मोठ्या कर्जाची कामे होतील. कायदेशीर कामांसाठी खर्च होतील.

धनू

नोकरीमध्ये बदल-बदली होण्याची शक्यता असून, पदोन्नती होईल. सामाजिक-राजकीय क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळेल. मात्र, वरिष्ठांशी जुळते घ्यावे लागेल.

मकर

नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल. नवीन संधी उपलब्ध होईल. प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती.

कुंभ

कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. वारसा हक्काच्या कामात कायदेशीर अडचणी येतील.

मीन

व्यवसायात मोठे बदल होतील. मात्र, विवाह सौख्यात रुसवे-फुगवे अनुभवास येतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

GST Reforms: Maruti Suzuki च्या लोकप्रिय कारच्या किंमतीत मोठी घट, ग्राहकांसाठी खरेदी करणे सोपे

Pune Dam Overflow : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील धरणं १०० टक्के ओव्हरफ्लो

Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, ३ दिवसांत केलं अर्धशतक

बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला अन् पुढं काय घडलं|VIDEO

SCROLL FOR NEXT