back to back transits saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: पुढचे ४ दिवस ४ ग्रहांचं होणार बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशींच्या व्यक्ती करणार पैशांची डबल कमाई

Surabhi Jagdish

सध्या ऑक्टोबर महिना सुरु असून या महिन्यात ग्रहांचं गोचर होतंय. वैदिक ज्योतिष्य शास्त्राच्या दृष्टीने हा महिना फार महत्त्वाचा मानला जातोय. आता देशभरात नवरात्रीची धूम सुरु आहे. 3 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या उत्सवामध्ये यावर्षी ग्रहांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये होणारे बदलही पाहायला मिळणार आहे. 8 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2024 या 5 दिवसात नऊ ग्रहांपैकी 4 महत्त्वाचे ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच आज गुरु ग्रह वक्री झाला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा स्वामी सूर्य दुपारी हस्त नक्षत्रातून बाहेर पडून चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

तसंच याच दिवशी बुध राशीचे तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर रविवारी शुक्र ग्रह सकाळी ६.०८ वाजता वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. या सर्व ग्रहांचा काही राशींच्या व्यक्तींवर खास परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्यावर कसा परिणाम होणार आहे.

मीन रास

शुक्र आणि सूर्याच्या स्थितीत बदल झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांमध्ये तर्कशक्ती विकसित होणार आहे. या काळात तुम्ही अचूक निर्णय घेऊ शकणार आहात. नोकरीत बढतीसह बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी हा काळ असणार आहे. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांवर 4 मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणरा आहे. यामुळे व्यवसायात तुमचे नवीन प्रयत्न उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण झाल्यामुळे तुम्हाला नफा होण्याची शक्यता दुप्पट आहे. विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील, चिंता नसावी.

मिथुन रास

वैदिक ज्योतिषशास्त्रातील चार प्रमुख ग्रहांच्या हालचालीतील बदलांचा मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होणार आहे. नवीन ग्राहकांशी संपर्क वाढल्याने व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक मतभेद संपल्याने नातेसंबंध मजबूत होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Two Groups Clash : अकोल्यात पुन्हा वाद उफाळला; हरिपेठातील भरचौकात दुसऱ्यांदा राडा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, VIDEO

IND W vs SL W: टीम इंडियासाठी गुड न्यूज! महत्वाच्या सामन्यात स्टार खेळाडू खेळणार; उप-कर्णधाराने दिली मोठी अपडेट

Nashik Crime: आपटी बॉम्ब घेऊन देण्याचे अमिष देत ७ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

Marathi News Live Updates: मुंबईसह पश्चिम उपनगरात मान्सूनच्या परतीचा पाऊस

Rajendra Raut : राऊत भाजपच्या तिकिटावर लढणार? बार्शीतील भाजपच्या जागेवर केला दावा

SCROLL FOR NEXT