Kendra Tirkon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Tirkon Rajyog: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे बनणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Kendra Tirkon Rajyog: शुक्र ग्रहामुळे केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं आयुष्य अधिक चांगलं होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशी परिवर्तन करतात. ज्योतिष्य शास्त्रामध्ये पंच महापुरुष राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग यांच्याबाबत माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र ग्रहामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. 18 सप्टेंबरला शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं आयुष्य अधिक चांगलं होणार आहे. काहींना या काळात पैशांची कमतरता भासणार नाहीये. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

तूळ रास

केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकणार आहे. काम करणा-या लोकांना प्रचंड यशासह बढती मिळणार आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या पगारात वाढीसोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे.

मकर रास

मकर राशीसाठी केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. मॉडेलिंगशी संबंधित लोकांना चांगला फायदा मिळू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India W vs South Africa W Final: रिप्लेसमेंट म्हणून आली, फायनलमध्ये चमकली, 'लेडी सेहवाग'ची अंतिम सामन्यात धुव्वाधार बॅटिंग

Maharashtra Live News Update: पुण्यात कोरेगाव पार्क अपघात प्रकरणी अपडेट; तिसऱ्या तरुणाचा मृत्यू

Bigg Boss 19: 'प्रत्येकाचं शरीर वेगळे असतं...'; सलमान खानसमोर रडली अशनूर कौर, म्हणाली- लाज वाटली पाहिजे...

Raigad Tourism : पांढरी शुभ्र वाळू अन् निळाशार समुद्र; रायगडमधील बेस्ट कपल स्पॉट

Pankaj Tripathi Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; 89 व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT