Shukra Gochar 2024 negative effects saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: शुक्र देवाचं गोचर ठरणार डोकेदुखी; 'या' राशींसाठी संकटांचा काळ झाला सुरु

Shukra Gochar 2024 negative effects: १८ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे. शुक्र ग्रहाच्या गोचरचा काही राशींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ठराविक काळानंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. असंच १८ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

शुक्र ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींवर होणार असून काही राशींवर चांगला होणार आहे, तर काही राशींवर विपरीत होण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सावधान राहण्याची गरज आहे, ते पाहूयात.

मीन रास

शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे तुमच्या उत्पन्नात चढ-उतार दिसून येणार आहे. बेहिशेबी खर्चामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागणार आहे. कोणत्याही वादात सापडू नका. येत्या काळात कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मकर रास

शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रभाव तुमच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित वादात थोडं सावध राहावं लागेल. कोणत्याही कामात निष्काळजीपणा केला तर तुमचा त्रास वाढू शकतो. वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांवर शुक्र गोचरचा अशुभ आणि नकारात्मक प्रभाव होणार आहे. .ा काळात डोळ्यांच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात. तुम्हाला मानसिकदृष्ट्याही मजबूत राहावं लागणार आहे. आर्थिक अडचणींमुळे तुम्ही त्रस्त असू शकता. कोणालाही कर्ज देणे टाळावे लागेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

Sanjay Dutt: संजय दत्तने मागितली महिला आयोगासमोर लेखी माफी; 'सरके चुनर' वादानंतर ५० मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

Maharashtra News Live Update: खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

Summer diet tips: उन्हाळ्यात हे पदार्थ खाणं टाळाच, नाहीतर...!

Riteish Deshmukh - Raja Shivaji : सैराटमधील प्रसिद्ध अभिनेत्याने रितेश भाऊंसोबत फोटो केला शेअर, 'राजा शिवाजी' मध्ये 'या' महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

SCROLL FOR NEXT