Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Surya Gochar 2024: सूर्याचा नक्षत्र प्रवेश 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक; बिझनेसमध्येही सहन करावं लागणार नुकसान

Surya Gochar 2024: वैदिक शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीत बदल करतो. तर यामध्ये सूर्य ग्रह दर महिन्याला रास बदलतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीत बदल करतो. तर यामध्ये सूर्य ग्रह दर महिन्याला रास बदलतात. सूर्याच्या गोचरचा संपूर्ण म्हणजेच 12 राशींच्या जीवनावर परिणाम होतो.

वैदिक पंचांगानुसार 19 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03:03 वाजता सूर्य देव अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी अनुराधा नक्षत्र 17 व्या क्रमांकावर आहे, ज्याचा स्वामी शनिदेव आहे. मात्र सूर्याच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे, ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीचे लोक एकटं वाटू शकतं. या काळात मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. यावेळी गुंतवणूक करणं योग्य नाही. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना मालमत्तेशी संबंधित वादामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

तूळ रास

हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला नाही. कुंभ राशीच्या लोकांसाठी यावेळी नव्या घर खरेदीचा निर्णय योग्य ठरणार नाही. तुम्हाला अचानक सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी भांडण होऊ शकणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदल शुभ ठरणार नाही. नोकरदार लोक तणावात राहण्याची शक्यता आहे. जे गुंतलेले आहेत, त्यांच्या चुकीमुळे त्यांचे नाते तुटू शकते. कुटुंबामध्ये एखादी वाईट गोष्ट घडू शकते. कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार अर्ज

Hair Color Care: केसांना केलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT