Venus And Sun Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra Aditya Rajyog: फेब्रुवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना अचानक धनलाभ होऊन तिजोरीत वाढणार पैसे

Shukra Aditya Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात एक शक्तिशाली शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. सूर्य आणि शुक्र एकत्र आल्यानंतर हा योग तयार होतो. हा योग संपत्ती, सुखसमृद्धी आणि यश देणारा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठरलेल्या वेळी त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे काही खास राजयोगांची निर्मिती होत असते. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर होत असतो.

येत्या फेब्रुवारीमध्ये, ग्रहांचा राजा सूर्य आणि संपत्ती देणारा शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे शुक्र आदित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींना सौभाग्य मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींसाठी हे लाभदायक ठरणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला आदर आणि सन्मान देखील मिळू शकतो. कौटुंबिक संबंध देखील मजबूत होऊ शकतात.

मिथुन रास

शुक्रादित्य राजयोगाच्या निर्मितीसह मिथुन राशीच्या राशीच्या लोकांना चांगला काळ येऊ शकणार आहे. हे गोचर तुमच्या राशीच्या भाग्याच्या घरात घडणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जमीन किंवा मालमत्तेची प्रकरणं तुमच्या बाजूने येणार आहेत. या काळात तुम्ही तुमच्या पालकांसोबत चांगला वेळ घालवाल

तूळ रास

शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून पाचव्या घरात गोचर करणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याच्या संधी देखील तुम्हाला मिळतील. या काळात वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठी आवक

Mumbai Mayor Reservation: मुंबईत भाजपचा महापौर कोण? या ६ लाडक्या बहिणींची नावं चर्चेत

Mumbai Mayor Race : मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यत वाढली, या ६ महिलांची नावं चर्चेत

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, काकाने पुतण्याचा झोपेतच काटा काढला; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

Skin Care : रोजच्या धावपळीत स्किन केअरकडे होतय दुर्लक्ष? मग 'ही' छोटीशी गोष्ट करा अन् चेहरा चमकवा

SCROLL FOR NEXT