Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Chandra Gochar 2025: भाऊबिजेच्या दिवशी चंद्राचं होणार गोचर; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार

Bhau Beej Moon Transit 2025: भाऊबीजेच्या दिवशी चंद्र एका विशिष्ट राशीतून गोचर करेल, ज्यामुळे ३ भाग्यवान राशींसाठी धन, समृद्धी आणि सुख-सौभाग्याचे योग जुळून येत आहेत. चला, पाहूया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर चंद्र आणि लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज संपूर्ण देशभरात भाऊबिजेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून तिलक लावतात आणि त्याच्या सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करतात. भावंडांमधील प्रेम आणि नात्याचा हा सण खूपच भावनिक आणि पवित्र मानला जातो.

या वर्षी भाऊबीजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत. ज्योतिषानुसार, चंद्राची ही तीव्र गती पुढील अडीच दिवसांपर्यंत काही राशींना विशेष लाभ देणारी ठरणार आहे. चला तर मग पाहूया की कोणत्या राशींना भाऊबीजच्या दिवशी चंद्राच्या गोचरामुळे फायदा होणार आहे.

मेष रास

भाऊबीजच्या दिवशी मेष राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समजूत वाढणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा डील मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार आहे. या काळात प्रवासाचे योगही आहेत.

धनु रास

चंद्राचा गोचर धनु राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. हा काळ मेहनतीने यश मिळवून देणारा आहे. जुनी कामं पूर्ण होऊन त्याचे चांगले परिणाम मिळणार आहेत. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या कर्जातून सुटका मिळू शकणार आहे. कोर्ट-कचेरी किंवा कायदेशीर बाबतीत तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो.

कुंभ रास

भाऊबीजेच्या दिवशी चंद्र कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देणार आहे. एखाद्याला थांबलेला पैसा परत मिळू शकणार आहे. उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक विषयांमध्ये तुम्ही निर्णायक भूमिका घेऊ शकता. नोकरीत प्रगती होईल आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT