Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar 2025: गणेश चतुर्थीपासून चमकणार 'या' २ राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या गोचरमुळे बसणार धन

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो या वर्षी २७ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. गणपतीला विघ्नहर्ता आणि बुद्धिमत्तेचे देवता मानले जाते. या शुभ मुहूर्तावर ग्रहांचा राजकुमार बुध नक्षत्र आणि राशी बदलणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुधदेवाला भगवान गणेशाचा खास आशीर्वाद लाभलेला आहे. ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं की, बुधदेवाला प्रसन्न करणं कठीण नाही. गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केली की ते लवकरच प्रसन्न होतात आणि बुद्धी, व्यापार आणि धनसंपत्तीचं वरदान देतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या काळात बुध ग्रहाची स्थिती आणि त्याचे गोचर यांना फार मोठं महत्त्व दिलं जातं.

या वर्षी वैदिक पंचांगानुसार गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट २०२५ बुधवार रोजी होणार आहे. तर समारोप ६ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. या दहा दिवसांत भक्त मोठ्या उत्साहाने बाप्पाची मूर्ती आणून त्यांची विधिवत पूजा करतील. दरम्यान, २९ ऑगस्टला बुध ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींचं भाग्य खुलणार आहे.

चला पाहूया कोणत्या राशींना मिळणार आहे मोठा लाभ –

तूळ रास

बुध ग्रहाच्या गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगलं यश मिळणार आहे. अडकलेली कामं पुन्हा वेगाने पुढे सरकणार आहेत. आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा लाभणार आहे.

उपाय: गणेश पूजेदरम्यान बाप्पाला दूर्वा आणि मोदक अर्पण करा.

कुंभ रास

या काळात कुंभ राशीच्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा राहणार आहे. घरातील पैशांचा तुटवडा दूर होईल. या काळात नवे करार होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि उत्साह वाढेल. नवे दागिने खरेदी करण्याचा योग तयार होणार आहे. शत्रूंवर विजय मिळवू शकणार आहात.

उपाय: श्रद्धेने गणेशाच्या मूर्तीवर सिंदूर लावा आणि लाडू अर्पण करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Thursday Horoscope: काहींना प्रवासातून लाभ, काहींना पैशांची तंगी जाणवणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT