Mangal Gochar  saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: तब्बल ३० दिवस राहणार मंगळाची कृपा; 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी

Mangal Gochar 2024: मंगळ 26 ऑगस्ट 2024 पासून मिथुन राशीमध्ये असून 20 ऑक्टोबर तो या राशीत असणार आहे. यावळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे, जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व आहे. यावेळी या नऊ ग्रहांमध्ये मंगळाचं खास स्थान आहे. मंगळाच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. मंगळ 26 ऑगस्ट 2024 पासून मिथुन राशीमध्ये असून 20 ऑक्टोबर तो या राशीत असणार आहे. यानंतर मंगळ ग्रह कर्क राशीत गोचर करणार आहे.

दरम्यान यामध्ये दोन वेळा मंगळाचं नक्षत्र गोचर देखील होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. यामध्ये काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर या चांगला परिणाम होऊ शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा सेनापती मंगळाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. नोकरदार लोकांच्या प्कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. या काळात तुम्हाला फार आनंद होणार आहे. अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकतात. नव्या नोकरीची संधी मिळणार आहे.

मीन रास

मंगळाच्या कृपेने मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकणार आहेत. 30 दिवसांत उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकणार आहेत. तुम्हाला भविष्यात भरपूर नफा मिळू शकतो. व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या कामावर आधारित वेतनवाढ मिळू शकणार आहे.

मेष रास

मंगळाच्या विशेष कृपेमुळे मेष राशीच्या लोकांच्या भरपूर पैसे मिळणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणुकीतून यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही चांगली भरारी घेऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची आणि मेहनतीची प्रशंसा होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

Maharashtra Live News Update: पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Winter Survival: ब्लॅंकेट, चादर नसताना पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे?

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? शरद पवार गट सोडणार काँग्रेसची साथ

SCROLL FOR NEXT