Which Zodiac Signs Will Benefit From Saturn Jupiter Transit saam tv
राशिभविष्य

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Zodiac signs fortune in 48 hours: शनि हा न्याय, कर्म आणि शिस्तीचा ग्रह आहे, तर गुरु हा ज्ञान, समृद्धी, विस्तार आणि भाग्याचा कारक आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह शुभ स्थितीत एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्माचा कर्ता शनि हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह मानला जातो. यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात त्याचा प्रभाव बराच काळ पाहायला मिळतो. शनि सध्या मीन राशीत वक्री स्थितीत आहे. अशा परिस्थितीत तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करणार आहे.

या काळात शनि गुरुशी जोडून शतांक योग तयार करणार आहे. ३१ जुलै रोजी रात्री १०:०९ वाजता ते एकमेकांपासून १०० अंशांवर असणार आहे. ज्यामुळे शतांक योग तयार होणार आहे. या विशेष योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग फायदेशीर असणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

शनि-गुरू शतांक योग या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरू शकणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता पूर्ण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या दूर होऊ शकणार आहेत. बऱ्याच काळापासून अडथळ्यांना तोंड देत असलेल्या कामाला आता गती मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. कुटुंबातील लोकांशी संबंध मजबूत होणार आहे.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी शनी आणि गुरु ग्रहाचा शतांक योग खूप फलदायी ठरणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहणार आहे. व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांसोबत असलेले मतभेद दूर होऊ शकतात.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु-शनीचा शतांक योग अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शतांक योग अनेक आनंद आणू शकणार आहे. यावेळी प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही पैसे जमवण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : लग्नसराईच्या तोंडावर सोने - चांदीचे दर घसरले, तुमच्या शहरातील आजचे दर? जाणून घ्या

Baramati rahuri bypolls election results: अकराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ९५ हजार ६५२ मतांची आघाडी

Langda Mango Name History: 'लंगडा' आंबा, आंब्याचं नाव 'लंगडा' कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास

Famous Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Assam Assembly Elections 2026: आसाममध्ये कुणाची सत्ता येणार? निकालाआधीच मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT