Surya Gochar  Saam Tv
राशिभविष्य

Surya Gochar: ६ फेब्रुवारीपासून पालटणार या राशींचं नशीब; 10 वर्षानी सूर्य करणार मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश

Surya Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी ६, २०२६ रोजी सूर्य मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा योग १० वर्षांनी पुन्हा निर्माण होत असून काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्याला ध्येयप्राप्ती, प्रतिभा, नेतृत्व, आदर, ऊर्जा, आत्मविश्वास, आशा आणि आनंदाचा कारक मानलं जातं. त्यावेळी जेव्हा सूर्याची हालचाल बदलते तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.

६ फेब्रुवारी रोजी सूर्य मंगळाच्या अधिपत्याखाली असलेल्या श्रावण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. परिणामी मंगळाच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश तीन राशींसाठी लाभदायक आहे. याव्यतिरिक्त संपत्ती आणि मालमत्तेत प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

सूर्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तुम्हाला भूतकाळातील समस्यांपासून मुक्तता मिळणार आहे. यामुळे मानसिक शांती मिळू शकणार आहे. या काळात आर्थिक लाभ आणि मोठ्या गुंतवणुकीत किंवा निर्णयांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

कुंभ रास

सूर्याच्या नक्षत्रातील बदल कुंभ राशीसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

मेष रास

सूर्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात आर्थिक आवक वाढण्याचे नवीन मार्ग समोर येणार आहे. अडकलेला निधी परत मिळू शकणार आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुमचं बोलणं प्रभावी असणार आहे. संयमाने निर्णय घेतल्याने आर्थिक फायदा होऊ शखतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT