राशिभविष्य

Shukra-Guru Yuti: दिवाळीत शुक्र आणि गुरुची युती करणार मालामाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Shukra And Guru Yuti On Diwali 2024: पंचांगानुसार 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीला 40 वर्षांनंतर गुरु आणि शुक्राचा समसप्तक योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांत्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतात. यावेळी एकाच राशीत दोन ग्रह आल्यामुळे ग्रहांची युती होते.

पंचांगानुसार 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. यंदाच्या दिवाळीला 40 वर्षांनंतर गुरु आणि शुक्राचा समसप्तक योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींचं नशीब चमकणार आहे.

मेष रास

गुरु आणि शुक्राचा समसप्तक योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात. नवीन काम करण्याची संधी मिळेल. तुम्हाला चांगला नफा देखील मिळणार आहे. नोकरदार लोकही या महिन्यात प्रगती करतील. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात.

वृषभ रास

गुरु आणि शुक्र यांचा समसप्तक योग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. हा महिना कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत घालवू शकणार आहात. या काळात व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकणार आहे.

धनु रास

गुरु आणि शुक्राचा समसप्तक योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याची संधी मिळणार आहे. वैयक्तिक जीवन आनंददायी राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT