surya shani mahagochar saam tv
राशिभविष्य

Surya Shani Yuti: सूर्य-शनीच्या महागोचरमुळे 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन; नशीबाचं टाळ उघडणार, तिजोरी धनधान्याने भरणार

Surya Shani Yuti effect: ग्रह-ताऱ्यांच्या गोचरचा परिणाम व्यक्तीच्या जीवनातील सुख-दु:ख, यश-अपयश, आरोग्य, करिअर, विवाह, पैसा यासंबंधीच्या घटनांवर होतो. यावेळी सूर्य आणि शनीच्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगलं फळ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र बदलाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह आणि नक्षत्र ठराविक काळासाठी त्याचं राशिचक्र किंवा नक्षत्र बदलतात. ग्रह-ताऱ्यांच्या गोचरचा परिणाम व्यक्तीच्या जीवनातील सुख-दु:ख, यश-अपयश, आरोग्य, करिअर, विवाह, पैसा यासंबंधीच्या घटनांवर होतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, 12 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत जाणार आहे. या राशीत शनिदेव आधीच विराजमान आहेत. यावेळी कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनीचा संयोग होणार आहे. सूर्य आणि शनीच्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगलं फळ मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

या राशीशी संबंधित लोकांना नोकरी तसंच व्यवसायापासून ते करिअरच्या बाबतीत विशेष लाभ मिळू शकणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. पती-पत्नीमधील तणाव दूर होण्याची शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कामात आर्थिक लाभ होणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा संयोग अत्यंत शुभ मानला जाणार आहे. नोकरदारांसाठी काळ चांगला राहण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी काळ चांगला राहणार आहे. अनावश्यक तणावातून आराम मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेली कामं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

कुंभ रास

सूर्य आणि शनीच्या संयोगाने तयार झालेला हा योग कुंभ राशीच्या लोकांसाठीही लाभदायक असणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकणार आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT