Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: सूर्य-चंद्राच्या युतीने बनला समसप्तक राजयोग; 'या' राशींवर अफाट राहणार लक्ष्मीची कृपा

Samsaptak Yog 2025: चंद्र आणि सूर्य एकमेकांपासून सातव्या भावात भ्रमण करतायत. यावेळी सूर्य धनु राशीमध्ये स्थित असून चंद्र आणि सूर्य यांनी समसप्तक राजयोग तयार केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दोन ग्रह एकत्र आले की त्यांची युती होते आणि यामुळे राजयोगाची निर्मिती होते. सर्व नऊ ग्रहांमध्ये वेगाने चालणारा ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र एका राशीमध्ये केवळ अडीच दिवस राहतो.

अशावेळी चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. चंद्र आणि सूर्य एकमेकांपासून सातव्या भावात भ्रमण करतायत. यावेळी सूर्य धनु राशीमध्ये स्थित असून चंद्र आणि सूर्य यांनी समसप्तक राजयोग तयार केला आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होणार आहे. तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

मकर रास

समसप्तक योग या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणणार आहे. पार्टनरशिपमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला खूप आर्थिक लाभ देऊ शकतो. येत्या काळात कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. कुटुंबात सुरू असलेला कलह संपुष्टात येऊ शकणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ होणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग फलदायी ठरू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होऊ शकणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात भरपूर नफा होण्याची चिन्ह आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT