वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह त्यांच्या नक्षत्रामध्येही बदल करतात.ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. याशिवाय तो नक्षत्रांमध्येही बदल करतो. होळीच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे.
१८ मार्च रोजी ३:२० मिनिटांनी ते उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्य आपल्या पुत्र शनीच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्याने, काही राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तर याउलट काही राशींचं नशीब उजळू शकणार आहे. या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे. उत्तरा भाद्रपद हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी २६ वं नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे आणि राशी मीन आहे. मीन राशीचा स्वामी गुरू आहे.
सूर्य उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि या राशीच्या अकराव्या घरात राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी किंवा गरजेसाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकणार आहे. वरिष्ठ अधिकारी देखील आनंदी दिसणार आहेत ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. प्रेम जीवन चांगले राहील.
सूर्य उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तुम्ही तुमच्या शब्दांनी आणि कृतींनी इतरांना प्रेरित करू शकता. आयुष्यात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं काम आता पूर्ण होऊ शकणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. जीवनात आनंद आणि शांती असेल.
ग्रहांचा राजा, सूर्य, वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रातही अव्वल स्थानावर राहू शकणार आहात. शेअर बाजार आणि व्यापाराद्वारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.