Surya And Shani Conjunction saam tv
राशिभविष्य

Surya-Shani Yuti: नव्या वर्षात होणार सू्र्य-शनीचा संयोग; 'या' राशींना मिळणार खुशखबर, उत्पन्नात होणार प्रचंड वाढ

Surya And Shani Conjunction 2025: वैदिक ज्योतिषात, सूर्य आणि शनि यांचं पिता आणि पुत्र म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. 2025 च्या सुरुवातीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुंभ राशीमध्ये शनी आणि सूर्याची युती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने नववर्ष फार खास मानलं जातंय. कारण या वर्षामध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करून काही राशींच्या आयुष्यावर परिणाम करणार आहेत. वैदिक ज्योतिषात, सूर्य आणि शनि यांचं पिता आणि पुत्र म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. सूर्यदेव हा मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी आणि आत्मविश्वासाचा कारक असून शनिदेव हा वय, कर्म, न्याय आणि श्रमाचा कारक मानला जातो.

सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 2025 च्या सुरुवातीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुंभ राशीमध्ये शनी आणि सूर्याची युती होणार आहे. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शनी आणि सूर्याची युती लाभदायक ठरू शकते. कारण हे संयोग तुमच्या ट्रान्झिट चार्टवरून 11 वं स्थान तयार करणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकणार आहे. नोकरीत तुम्हाला इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा होऊ शकतो.

वृषभ रास

शनी आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. नोकरदारांना यावेळी प्रमोशन मिळू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरी मिळू शकणार आहे. या काळात तुमचा बॉस आणि अधिकारी तुमच्यावर खूश राहणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचं सहकार्य मिळू शकणार आहे.

मकर रास

सूर्य आणि शनीची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. कामातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होणार आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नातेसंबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकणार आहे. इतर कामांमधून पैसे देखील मिळवू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT