Padmak Yog 2024 saam tv
राशिभविष्य

Padmak Yog 2024: सूर्य-चंद्र तयार करणार अत्यंत दुर्मिळ पद्मक योग; 'या' राशींच्या घरी येणार फक्त पैसा

Padmak Yog 2024: या वर्षीची कार्तिक पौर्णिमा खूप खास आहे. कारण या दिवशी शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत मार्गी होणार आहे. दरम्यान शास्त्रामध्ये सूर्य आणि चंद्र पद्मक योग निर्माण करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ते कार्तिक पौर्णिमा हा काळ अतिशय शुभ मानला जातो. या 5 दिवसांना भीष्म पंचक असंही म्हटलं जातं. अशी धारणा आहे की, या काळात विष्णूची उपासना केल्याने त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. या वर्षीची कार्तिक पौर्णिमा खूप खास आहे. कारण या दिवशी शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत मार्गी होणार आहे.

दरम्यान शास्त्रामध्ये सूर्य आणि चंद्र पद्मक योग निर्माण करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार पद्मक योग हा दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे.

मेष रास

या राशीच्या आठव्या घरात सूर्य आणि गुरू आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठीही पद्मक योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. बराच काळ प्रलंबित असलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. पद्मक योग तयार झाल्याने या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान वाढणार आहे. नोकरदार लोकांसाठीही हा दिवस खूप चांगला असणार आहे.

मिथुन रास

या राशीत सूर्य सहाव्या भावात असणार आहे. तुम्ही करत असलेल्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळे तुम्ही यश मिळवू शकता.तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुम्हाला बरेच फायदे मिळू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं परफॉर्मंस चांगला असणार आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी तिसऱ्या घरात पद्मक योग तयार होतोय. या वेळी तुमच्यावर मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. कुटुंबासोबत चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत खुले होणार आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT