Surya Ketu Yuti 2024 In Kanya saam tv
राशिभविष्य

Surya Ketu Yuti: 18 वर्षांनी होणार सूर्य-मायावी केतूची युती; 'या' राशींच्या व्यक्तींना करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

Surya Ketu Yuti 2024 In Kanya: येत्या काळात सूर्य देव आणि मायावी ग्रह केतू यांची युती होणार आहे. दरम्यान या काळात काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एकाच राशीत ग्रहांची युती निर्माण होते. या युतीचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतो. सप्टेंबर महिन्यात सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. तर या केतू जिथे केतू ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. ही युती सुमारे 18 वर्षांनी होणार असून काही राशींच्या व्यक्तींसाठी ही युती लाभदायक ठरणार आहे.

सूर्य आणि केतू यांचा संयोग अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी काही राशींना अचानक पैसे मिळू शकतात. तर काही राशींना करियरमध्ये चांगली संधी मिळू शकते. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृश्चिक रास

सूर्य आणि केतूचा संयोग या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमचं मन अध्यात्माकडे अधिक असणार आहे. संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिक परिस्थितीत तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी लाभही मिळू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

तूळ रास

या राशीमध्ये सूर्य बाराव्या भावात असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकणार आहे. नव्या कमाईचे मार्ग उघडतील. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. भविष्यासाठीही चांगली संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

मकर रास

या राशीमध्ये सूर्य आणि केतू यांचा संयोग नवव्या भावात असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाता येऊ शकतं. तुम्ही तुमच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळणार आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT