Shani Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Gochar : लवकरच शनी देव करणार राहुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींवर बसणार पावसाप्रमाणे पैसा

Shani Nakshatra Gochar : येत्या काळात शनी देव नक्षत्र गोचर करणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनी त्याचं नक्षत्र बदलणार असून या काळात काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह राशींप्रमाणे नक्षत्र परिवर्तन देखील करतात. येत्या काळात शनी देव त्यांच्या नक्षत्रामध्ये बदल करणार आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शनी राहूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनी त्याचं नक्षत्र बदलणार असून या काळात काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 3 ऑक्टोबर रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी 12:10 वाजता शनी देव राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. सध्या शनी पूर्वाभाद्रपदा या गुरूच्या नक्षत्रात आहेत. काही राशींना शनीचं नक्षत्र परिवर्तन त्रासदायक ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात या आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

सिंह रास (Leo)

शनीच्या नक्षत्र बदलाचा फायदा सिंह राशींच्या व्यक्तींसाठी होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी इतर सहकार्य तुमची मदत करणार आहेत.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहे. आगामी काळात तुम्हाला गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो.

मीन रास (Pisces)

शतभिषा नक्षत्रात शनीच्या प्रवेशाने मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक नवीन बदल घडू शकतात. तुम्हाला अचानक कुठून तरी पैसा मिळू शकणार आहे. व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

SCROLL FOR NEXT